‘कॅट’ आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा जाहीर पाठिंबा

सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेटे : बंदमध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता काळ्या फिती लावून आंदोलन

मालवण दि.२५-: जिएसटी कायद्यातील जाचक तरतूदी व अधिकाऱ्यांच्या मनमानीला पोषक ठरणाऱ्या नव्या तरतूदींच्या विरोधात व्यापाऱ्यांच्या कॅट या देशपातळीवरील व महाराष्ट्र चेंबर सह अन्य संघटनांनी दि.२६फेब्रू.रोजी भारत बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा जाहिर केला असला तरी महासंघ बंदमध्ये प्रत्यक्ष सहभागी न होता काळ्या फिती लावून आणि आपल्या दुकानां बाहेर काळे झेंडे लावून जिएसटी कायद्यातील जाचक तरतूदीं विरोधी या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे अशी माहिती सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन तायशेटे यांनी दिली आहे जिएसटी कायद्यातील जाचक तरतूदी व अधिकाऱ्यांच्या मनमानीला पोषक ठरणाऱ्या नव्या तरतूदींच्या विरोधात दि.२६फेब्रू.रोजी भारत बंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा जाहिर केला आहे मात्र नुकताच ३१जानेवारीला एकता मेळाव्याच्या निमित्ताने बंद पाळून आपल्या एकजुटीचे प्रदर्शन सिंधुदुर्गातील व्यापारी बांधवांनी केलेले असल्याने पुन्हा बंद न पाळता २६फेब्रूवारीला सर्व व्यापाऱ्यांनी काळ्याफिती लावून आणि आपल्या दुकानां बाहेर काळे झेंडे लावून जिएसटी कायद्यातील जाचक तरतूदीं विरोधी या आंदोलनात सहभागी व्हावे असा निर्णय महासंघाने घेतला आहे.या दिवशी सर्व तालुका संघटना आपापल्या तहसिलदारांना निवेदने सादर करतील आणि जिल्हास्तरावर सिंधुदुर्ग नगरी येथे जिल्हा मुख्यालयात महासंघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले जाणार आहे .मात्र ज्या सभासदांना आपली दुकाने स्वेच्छेने बंद ठेवून आंदोलनात सहभागी व्हायचे आहे त्यांना तसे करण्याची पुर्ण मोकळीक आहे. उद्या शुक्रवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी आपल्या दुकानांच्या बाहेर काळे झेंडे आणि आपल्या दंडावर काळ्याफिती लावून जिएसटी कायद्यातील जाचक तरतूदींच्या विरोधात आपला असंतोष प्रकट करावा असे नितीन तायशेटे यांनी म्हटले आहे

You cannot copy content of this page