कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी सावंतवाडी नगरपालिकेचा निर्णय; नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली माहिती*
*💫सावंतवाडी दि.२४-:* सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून शासकीय विश्रामगृह येथे उद्यापासून मोफत आर.टी.पी.सी.आर चाचणी सुरू करण्यात येणार आहे. या बाबतची माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली आहे. राज्यात वाढत असलेला कोरोना आजाराचा प्रादुर्भाव पाहून तो रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी शहरातील व्यापारी, फळ विक्रेते, फिरते व्यापारी, तसेच व्यवसायासाठी फिरणारे लोक यांनी येथे आपली तपासणी करून घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.