बारावी निकाल ९७.०८ टक्के
वैभववाडी प्रतिनिधी
बारावी परीक्षेचा वैभववाडी तालुक्याचा निकाल ९७.०८ टक्के लागला आहे. तालुक्यातील पाच कनिष्ठ महाविदयालयातून एकूण 1647 विदयार्थी परीक्षेस बसले होते. यापैकी 1599 विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत. वैभववाडी तालुक्यातून कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविदयालयाचा वाणिज्य शाखेचा अनिकेत संतोष कुलकर्णी 88.17 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे.तर याच विदयालयाची वाणिज्य शाखेची कु.वैष्णवी औदुंबर तळेकर व कला शाखेची मनस्वी दिलीप शिंदे 86.33 टक्के मिळत द्वितीय तर समाधान रमेश सुतार वाणिज्य शाखा 81.33 टक्के मिळवत तिसरा आला आहे.
कै.हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविदयालयाने बाजी मारली आहे.
छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक नेर्ले – तिरवडे कॉलेजचा निकाल 100 टक्के इतका लागला आहे. वाणिज्य शाखेतून एकूण 13 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. प्रथम क्रमांक – कु. सायली दीपक घागरे 80.17 टक्के, द्वितीय क्रमांक प्रणिता पांडुरंग कदम 72.33 टक्के, तृतीय क्रमांक अजित लक्ष्मण धावडे 70.67 टक्के.
कला शाखेतून एकूण 35 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 33 विद्यार्थी उत्तीर्णे आहेत. कला शाखेचा निकाल 94.28 टक्के इतका लागला आहे.
प्रथम क्रमांक – भक्ती रमेश कुळये 67.17 टक्के, द्वितीय क्रमांक – आकाश लक्ष्मण राठोड 66.33 टक्के, तृतीय क्रमांक – रीना राजेंद्र घागरे 65.83 टक्के यांनी पटकाविला आहे.
आदर्श विद्या मंदिर भुईबावडा कॉलेजचा निकाल 98 टक्के इतका लागला आहे. या कॉलेजमध्ये कला शाखेतून एकूण 11 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रमांक – प्रतीक संतोष तळेकर 64 टक्के, द्वितीय क्रमांक – कोमल विश्वनाथ कदम 59 टक्के, तृतीय क्रमांक सुरज रामकृष्ण भोसले 56.17 टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के इतका लागला आहे. या शाखेतून एकूण 13 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. प्रथम क्रमांक – ऐश्वर्या मंगेश मोरे 75.83 टक्के, द्वितीय क्रमांक – श्रावणी हनुमंत पाटील 71.83 टक्के, तृतीय क्रमांक – हर्षद राजाराम चंदुरकर 69.33 टक्के.
आचिर्णे विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय आचिर्णे कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेतून एकूण 36 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रमांक – शार्दुल सुधीर शिरसाट 71 टक्के, द्वितीय क्रमांक – पूनम उत्तम पावले 70.67 टक्के, तृतीय क्रमांक – आदित्य तानाजी गुरव व प्राची रमेश अग्रे 70.33 टक्के यांनी पटकाविला आहे.
वाणिज्य शाखेचा निकाल 94.44 टक्के लागला आहे. या शाखेतून एकूण 36 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. त्यापैकी 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रमांक – ऋतुजा रामचंद्र रावराणे 72.33 टक्के, द्वितीय क्रमांक – प्रतीक्षा रामदास शेलार 70.50 टक्के, तृतीय क्रमांक – सानिका स्वप्निल रावराणे 69.50 टक्के यांनी पटकाविला आहे.
कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 99.18 टक्के इतका लागला आहे. या कॉलेजमधून एकूण 246 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 244 उत्तीर्ण झाले आहे. कॉलेजचा कला शाखेचा निकाल 100 टक्के इतका लागला आहे. कला शाखेतून 60 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रमांक – मनस्वी दिलीप शिंदे 86.33 टक्के, द्वितीय क्रमांक – शिवाजी बोडेकर 80 टक्के, तृतीय क्रमांक लावण्या विठ्ठल काळे 76.17 टक्के.
वाणिज्य शाखेचा निकाल 98.86% इतका लागला आहे. या शाखेतून 88 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 87 उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रमांक – अनिकेत संतोष कुलकर्णी 88.17 टक्के, द्वितीय क्रमांक – वैष्णवी औदुंबर तळेकर 86.33 टक्के, तृतीय क्रमांक – समाधान रमेश सुतार 81.33% विज्ञान शाखेचा निकाल 98.97 टक्के. विज्ञान शाखेतून 98 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 97 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रमांक – स्वरूपा सुधाकर येवले 79.33 टक्के, द्वितीय क्रमांक – पार्थ सचिन शिरसागर 76.83 टक्के, तृतीय क्रमांक हार्दिक प्रदीप शिंदे 72.17 टक्के यांनी मिळविला आहे.
माधवराव पवार कनिष्ठ महाविदयालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे. एकूण ३३ विदयार्थी परीक्षेस बसले होते. सर्व उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम क्रमांक ढेबे रुपाली विठ्ठल 69.5 टक्के, द्वितीय क्रमांक जावडेकर पूजा प्रवीण 68.17 टक्के , तृतीय क्रमांक पवार प्राची प्रकाश 67.17 टक्के .
