नडगिवे ग्रामदैवत गांगेश्वर मदिराचा १० वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

शुन्य कचरा मोहिमेसाठी जनजागृती

⚡कणकवली ता.२४-: नडगिवे येथील ग्रामदैवत श्री गांगेश्वर पावणा देवी वार्षिक १० वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला .यावेळी पारंपारिक पद्धतीने पालखी नाचविली गेली. या उत्सवात अबालवृद्ध सहभागी झाले होते ढोल – ताशाच्या गजरात वाजत्री चौघड्याचा नादात व जयघोषात हा कार्यक्रम झाला. सासुरवाशीनी ओट्या मान्य करून घेतल्या.


हिरव्यागार देवराईतमध्ये वसलेले या मदिराचा १० वर्धापन दिनाला चाकरमान्याची मोठी गर्दी होती . यानिमित्त सकाळपासून अभिषेक, महाआरती, दुपारी महाप्रसाद, हळदीकुंकू, विद्यार्थांच्या गुणगौरव समारंभ, डबलबारी भजनाचा जंगी सामना आदीकार्यक्रम झाले . यावेळी झालेल्या समारंभात गावच्या महिला सरपंच सौ. माधवी मण्यार, मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मण्यार , सरचिटणीस भास्कर राणे अरविद मण्यार ,प्रमोद मुद्रस, दिलीप मण्यार, चंद्रकांत मण्यार, प्रकाश मुद्रस, अरविद् आंबेकर, प्रकाश मुद्रस, रुपेश हिवालकर, किशोर मुद्रस ,माजी सरपंच गजानन सावंत आदी मान्यवर उपस्थित होते . सामाजिक कार्यकर्त्ते प्रमोद मुद्रस यांनी मंदिराच्या वर्धापनाचे औचित्य साधून शुन्य कचरा मोहिम राबविली . कचरा मुक्त गाव करण्याचा संकल्प आला . शाळा धार्मिक स्थळे ,सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे प्रकार व त्याची विल्हेवाट कशी करावी, प्लॉस्टिक बाटल्या त्याची विल्हेवाट कशी करावी या बाबत जनजागृती भाविकांत केली . पत्रके वाटली जन जागृती केली . या कार्यक्रमांचे सुत्रसचालन भास्कर राणे तर सर्वाचे आभार रुपेश हिवालकर यांनी मानले.

You cannot copy content of this page