ग्रामविकास अधिकारी बहिरम यांचा शिवसेनेने केला सत्कार

जिल्हा बदली झाल्याने केला सन्मान

⚡आंबोली,ता.२२-: येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी श्री रतीलाल बहिरम यांची जिल्हा बदली झाल्याने आंबोली शिवसेनेतर्फे त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

ग्रामविकास अधिकारी रतीलाल बहिरम हे मूळचे धुळे जिल्ह्यातील साक्री तालुका दहीवेल गावचे. सिंधुदुर्गात २००५ मध्ये ग्रामसेवक म्हणून भरती झाले.त्यानंतर देवगड बापर्डे येथे ग्रामसेवक म्हणून रुजू झाले.पोम्बुर्ली,मोंड या नंतर आंबोलीत साडे सहा वर्षे ग्रामविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले.या ठिकाणी त्यांनी चांगली सेवा दिली.दरम्यान त्यांनी आपल्या तालुक्यात बदली घेतली असल्याने त्यांची जिल्हा बदली झाली आहे.उद्या येथील चार्ज चौकुळ ग्रामविकास अधिकारी श्रीरंग जाधव यांच्याकडे देण्यात येणार आहे.आज आंबोली शिवसेनेतर्फे त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत सदस्य काशिराम राऊत,शिवसेना विभाग अध्यक्ष बबन गावडे, उपाध्यक्ष उत्तम पारधी,अनिल चव्हाण,संजय परब,वनविभागाचे बाळा गावडे, ग्रामपंचायत लिपिक आबा नार्वेकर,कोतवाल लाडू गावडे, निलेश सावंत,स्वप्नील जाधव,सचिन नार्वेकर यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

You cannot copy content of this page