इन्सुली येथे ग्लोबल रोड सेफ्टी सप्ताह साजरा…

बांदा/प्रतिनिधी
रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग उपप्रादेशिक परिवहन कार्यालयच्या वतीने बांदा इन्सुली येथील सीमा तपासणी नाका विभागाकडून सातवा ग्लोबल रोड सेफ्टी सप्ताह साजरा करण्यात आला. १५ मे ते २१ मे दरम्यान उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांच्या वतीने सीमा तपासणी नाका इन्सुली येथे अवजड वाहतूक तसेच प्रवासी वाहतूक करणारी वाहने यांच्या वाहन चालकांकरिता रस्ता सुरक्षा तसेच वाहतुकीचे नियम या संबंधी प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमामध्ये वाहनांना परावर्तक व रस्ता सुरक्षा बोधचिन्ह यांची स्टिकर्स लावण्यात आली. तसेच “पादचाऱ्यानी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे” या करता त्यांचे प्रबोधन करण्यात आले.
हा कार्यक्रम उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग यांचे अधिकारी मोटार वाहन निरीक्षक सचिन पोलादे, विजयकुमार अल्लामवार, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विनायक सपकाळ, पराग आऊलकर, वरिष्ठ लिपिक गणेश कोळी यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमास रा. प. म. चे कर्मचारी दिपक सातवळेकर व चालक श्री चिंदरकर तसेच मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे प्रतिनिधी अनिल पावसकर, पीयुसी सेंटर चालक प्रसाद सावंत तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.

You cannot copy content of this page