आंबोली,ता.20: येथील हिरण्यकेशी येथे पुनः प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम आजपासून करण्यात आला.आज पुण्यहवाहन,जलधीवास,तसेच धार्मिक होमहवन कार्यास प्रारंभ करण्यात आला.उद्या होमहवन,मूर्ती जळीत घालणे, वैगेरे कार्यक्रम परवा सोमवारी श्री गणेश,शिवलिंग,गंगा देवी,आणि श्री दत्त मूर्ती प्राणप्रतिष्ठापना,गाय वासरू पूजन करण्यात येणार आहे.महाप्रसाद असणार आहे त्यानंतर नारळ ,ओटी ठेवणे वैगेरे कार्यक्रम होणार आहेत.सर्व भाविकांनी तसेच शिमधडे पंचक्रोशी लोकांनी सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हिरण्यकेशी पून: प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमास प्रारंभ
