शिवसेना सिंधुदुर्ग सोशल मीडिया जिल्हाप्रमुख महेश तेली पुन्हा काँग्रेसमध्ये

⚡कणकवली ता.१९-: शिवसेना सिंधुदुर्ग सोशल मीडिया जिल्हाप्रमुख महेश तेली पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. व त्यांच्या येण्यामुळे काँग्रेसची ताकद वाढलेली आहे.

काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद भाई शेख यांच्या उपस्थितीत महेश तेली यांनी राष्ट्रीय काँग्रेस मध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेस पक्षाने त्यांना तालुका सरचिटणीस व मीडियाची जबाबदारी दिलेली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर, शहराध्यक्ष अजय मोरये, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अनिकेत दहिबावकर ,निलेश मालडंकर, प्रदीपकुमार जाधव, कमलाकर तांबे, राजू वर्णे, अनिल डेगवेकर, जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरुणकर , अमित मांडवकर, संतोष तेली, अक्षय घाडीगावकर पंढरीनाथ पांगम व अनेक पदाधिकारी व काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.

You cannot copy content of this page