आंबोली पोटनिवडणुकीत भाजपाचे दिपक नाटलेकर विजयी

आंबोली ता.१९-:आंबोली ग्रामपंचायत पोटं निवडणूक वॉर्ड 4 मध्ये भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी झाला.दीपक नाटलेकर 298,शिवसेना बुधाजी पाताडे 183,अपक्ष विलास गावडे 17 मते मिळाली.

दरम्यान शिवसेनेने चांगली लढत दिली.सेनेला मतदान केलेल्या मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे पदाधिकारी आणि उमेदवार श्री पाताडे यांनी आभार मानले आहेत. सध्या येथे भाजप पुरस्कृत सरपंच आणि भाजप 7 सदस्य संख्या झाली आहे.सेनेचे 4 सदस्य आहेत.

ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक होऊन जवळपास साडे तीन वर्षे झाली आहेत. आणखी दीड वर्षांनी पुन्हा निवडणूक आहे.त्यावेळी सार्वत्रिक मतदार सरपंच ठरवणार आहेत.त्यामुळे सदस्य पदासाठी चुरशीची निवडणूक ही शेवटची होती.

You cannot copy content of this page