⚡सावंतवाडी ता.१७-: बंद घरातील लोखंडी पेटीमधील रोख ६० हजार रुपये अज्ञात चोरटाने लंपास केल्याची घटना काल रात्री कोलगाव निरुखेवाडी येथे घडली. याबाबत बाबू केदु शेळके(65) याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की बाबू शेळके यांच्या नातलगाचे लग्न असल्याने ते मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता घर बंद करून दोडामार्ग येथे लग्न कार्यासाठी गेले होते रात्री साडेनऊ वाजता पुन्हा घरी परतल्यावर अज्ञात चोरट्याने किचन रूमच्या खिडकीची काच उघडून आई चिमणाबाई शेळके यांचे लोखंडी पेटीमध्ये ठेवलेले रोग साठ हजार रुपये चोरीला गेल्याचे दिसून आले या प्रकारानंतर त्याने सदर घटनेची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली घटनास्थळी पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज राऊत यांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला त्यानंतर मुलगा बाबू शेळके यांनी दिलेल्या तक्रारीवर पोलीस ठाण्यात अन्यथा विरोधात गुन्हा दाखल केला मात्र बुधवारी सदरचे पैसे आईला साडी ठेवल्याचे आढळून आले त्यामुळे या घटनेचा घडा झाल्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सांगितले.
