⚡कणकवली ता.११-: कासार्डे तांबळवाडी येथील श्री. आवळेश्वर देवस्थान येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध मान्यवरांचा देवस्थानच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी सकाळी ९ वा. अभिषेक, सत्यनारायण महापूजा व तिर्थप्रसाद, दुपारी १ ते ३ महाप्रसाद, ३ ते ५ वा. महिलांसाठी हळदीकुंकू, संध्याकाळी ५ ते ८ स्थानिक भजने आणि रात्रौ ठिक ९ नंतर राजापुर तालुक्यातील आजिवली सोनारवाडी येथील बुवा प्रविण सुतार, देवगड तालुक्यातील नाडण येथील बुवा संदिप पुजारे आणि बुवा मुंबई भांडुप येथील बुवा सुशिल गोठणकर यांच्यात आमनेसामने तिरंगी भजनांचा जंगी सामना झाला. या कार्यक्रमानिमित्त विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
यानिमित्त सरपंच निशा नकाशे, उपसरपंच गणेश पाताडे, ग्रामपंचायत सदस्य अभिजित धुमाळ, मिलिंद पाताडे, आण्णा खाडये, बाळा जोशी, विजय राणे, जयवंती जमदाडे, श्रध्दा शेलार, उद्योजक संतोष पारकर, प्रणिल शेटये, दिलीप राठोड, विद्याधर नकाशे, अभिजित केवटे, राजा सावंत, दिपक गायकवाड, निलेश सोरप, विनायक बांदिवडेकर आदी मान्यवर व बुवा सुशील गोठणकर, संदीप पुजारे, प्रवीण सुतार, संतोष तळेकर, प्रथमेश जनक आदींचा देवस्थानच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. विनायक पाताडे यांनी तर आभार ग्रामसेवक निलेश पाताडे यांनी केले.
