राजीनामा मागे घेतल्याबद्दल व्यक्त केले आभार
⚡कणकवली ता.११-: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची मुंबई येथे सिंधुदुर्गातील राष्ट्रवादी नेते माजी नगरसेवक अबिद नाईक यांनी सिल्वर ओक या निवासस्थानी भेट घेतली.
राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्ष अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मागे घेतल्यामुळे त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. भेटीवेळी अबिद नाईक यांच्या सोबत त्यांच्या बहिण अमिता खान,अबिद नाईक यांची मुलगी रिजा नाईक, भाचा नबील खान,भाची जारा खान उपस्थित होते.
