राज्यस्तरीय आदर्श पत्रकार सन्मानाने दयानंद मांगले पंढरपूर येथे सन्मानित

⚡देवगड ता.११-: ब्लु स्टार सामाजिक व बहुउद्देशीय संस्था राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २०२३ श्री क्षेत्र पंढरपूर येथे हॉटेल विठ्ठल इन् सभागृहात मान्यवर अतिथींच्या उपस्थितीत पार पडला.


यात राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार करीता देवगडचे जेष्ठ पत्रकार दयानंद यशवंत मांगले यांची निवड करण्यात आली व हा पुरस्कार मानाचा फेटा,सन्मान चिन्ह,शाल सन्मानपत्र देऊन त्यांना खादी ग्रामोद्योग मंडळ सांगोला चेअरमन शंकरराव गायकवाड यांच्या हस्ते पंढरपूर येथे नुकताच प्रदान करण्यात आला.


या सोहळ्यास भागीरथी भोईर प्रतिष्ठान अध्यक्ष दिनेश भोईर, विस्तार अधिकारी मनीषा गायकवाड, पद्मजा खटावकर अध्यक्ष विमल बनसोडे,सचिव चंदन बनसोडे व अन्य उपस्थित होते.


मागील एक महिन्याच्या कालावधीत पश्चिम महाराष्ट्र प्रांतात श्री मांगले याना राज्यस्तरीय समाजरत्न,राज्यस्तरीय समाजभूषण,राज्यस्तरीय आदर्श पत्रकार असे तीन सन्मान प्राप्त झाले असून पुरस्कारांची हॅट्ट्रिक साधली असल्याचे आवर्जून नमूद करण्यात आले .


या सत्काराप्रसंगी दयानंद मांगले म्हणाले गेली ३५ वर्षे सामाजिक सांस्कृतिक ,पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असताना विविध प्रातातुन केलेला सन्मान हा मला नेहमीच नवी प्रेरणा उत्साह व आशिर्वाद रुपी असल्याने मला त्याचा अभिमान आहे.समाजासाठी काम करत आहे त्याची ही पोच पावती मिळाली असल्याचे आवर्जून सांगितले.

यावेळी राज्यभरातील विविध प्रांतातून सत्कार मूर्ती व मान्यवर बंधू भगिनी उपस्थित होते.
फोटो-दयानंद मांगले याना पुरस्कार प्रदान करताना शंकरराव गायकवाड व अन्य

You cannot copy content of this page