⚡बांदा ता.१०-: रोणापाल कुळकार देवाच्या वाढदिवसानिमित्त गुरुवार 11 मे रोजी सकाळी 11 वा. कुळघर देऊळवाडी येथे सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने संध्याकाळी 7 वा. मामा मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा श्री दत्त माऊली नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे. भाविकांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
रोणापाल मध्ये 11 रोजी ‘श्री दत्त माऊली’ नाटक
