पालिकेच्या स्विमिंग पूल मधील युवकाच्या मृत्यू मुख्याधिकारी जयंत जावडेकर जबाबदार…

निशांत तोरसकर ; सदोष मनुष्यबदाच्या गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबन करा..

⚡सावंतवाडी ता.०९-: पालिकेच्या स्विमिंग पूलचा ठेका घेणारा ठेकेदार हा परिपूर्ण अनुभवी नाही हे माहित असूनही त्याला ठेका देणारे पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर हेच स्विमिंग पूल मध्ये युवकाच्या झालेल्या मृत्यूस सर्वस्वी जबाबदार असल्याने त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निशांत तोरसकर याने आज येथे पत्रकार परिषदेत केली.

तर संबंधित ठेकेदार व त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या लाइफगार्डवरही पोलिसांनी गुन्हा दाखल करावा अन्यथा आम्ही खाजगी गुन्हा दाखल करू वेळ पडल्यास जनतेला सोबत घेऊन आंदोलन करू असा इशाराही श्री. तोसकर यांनी दिला.


श्री तोरसकर म्हणाले, येथील पालिकेच्या स्पोर्ट कॉम्प्लेक्स मधील स्विमिंग पूल मध्ये ग्लेन डिसोजा या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुळात स्विमिंग पूल चा ठेका देताना तो ठेकेदार परिपूर्ण प्रशिक्षित असणे गरजेचे आहे संबंधित ठेकेदार हा सीपीआर ट्रेनिंग सर्टिफिकेट धारक असणे गरजेचे आहे मात्र याबाबत माहिती असताना सुद्धा पालिकेच्या स्विमिंग पूलचा ठेका देताना मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी पूर्णतः दुर्लक्ष केले मुळात संबंधित ठेकेदाराने एका महिला कृषी अधिकार्‍याची कागदपत्रे जोडून हा ठेका मिळविला आहे. याबाबत आपण मुख्याधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते पण त्या तक्रारीचे साधे स्पष्टीकरण अथवा चौकशी सुद्धा केली नाही त्यामुळे झालेल्या प्रकार हा त्यांच्याच हलगर्जीपणामुळे झाला आहे असे उघड होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे. त्यांची खात्या अंतर्गत चौकशी होईपर्यंत त्यांना कुठेही रुजू करून घेऊ नये.
श्री तोरसकर पुढे म्हणाले, जी घटना घडली त्यावेळी संबंधित मृत झालेल्या युवकाला प्राथमिक उपचार देणे गरजेचे होते परंतु दुर्दैवाने याबाबत आवश्यक असलेले सी पी आरचे ट्रेनिंग त्यांना नसल्यामुळे कोणतीही प्रक्रिया झाली नाही त्यामुळे एका युवकाला आपला जीव गमवावा लागला. संबंधित ठेकेदार आणि प्रशिक्षकांनी टेंडर मध्ये दिलेली कागदपत्रे ही बोगस आहे एका कृषी अधिकाऱ्याचा दाखला जोडला आहे जोडला गेला आहे तसेच एका रिसॉर्ट मध्ये चार फुट खोल असलेल्या स्विमिंग पूलचा ट्रेनिंग दाखला जोडला आहे हा सर्व प्रकार म्हणजे फसवणूक आहे त्यामुळे त्या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी व संबंधितदार गुन्हे दाखल व्हावे अशी मागणी त्यांनी केली आहे तसेच याप्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे शवविच्छेदन अहवाल हा पाण्यात बुडून मृत्यू झाला असा आलाय त्यामुळे या प्रकारात पोलिसांनीही कठोर भूमिका घ्यावी. आपण याबाबत पालकमंत्री जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक स्थानिक पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे संबंधित ठेकेदारासह सर्वस्वी जबाबदार असलेले पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही प्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागली तरी आपण घेणार आहे.

You cannot copy content of this page