सिद्धार्थ कला ,क्रीडा युवक मंडळ व महिला बचतगटांचे आयोजन
बांदा/प्रतिनिधी
सिद्धार्थ कला क्रीडा उवक मंडळ आणि सर्व महिला बचत गट सिद्धार्थ नगर करिवडे च्या वतीने बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती उत्सव बुधवार दिनांक १० रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त अभिवादन सभेसह वविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत.
सकाळी १० वाजता प्रतिमा पुष्पहार व त्रिसरण पंचशील, सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, सायंकाळी ५ वाजता जयभीम रॅली, सायंकाळी ७ वाजता अभिवादन सभा होणार आहे. या सभेत प्रमुख वक्ते सगुण जाधव भारत मुक्ती मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा प्रभारी हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमास धम्म बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
