⚡मालवण ता.०९-: मालवण येथील श्री भैरवी देवालय बाळगोपाळ मित्रमंडळातर्फे २० मे रोजी सोमवार पेठ येथील भैरवी मंदिरचा चौदावा वर्धापन दिन सोहळा विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित २१ रोजीही कार्यक्रम होणार आहेत.
शनिवार २० रोजी रात्री १० वा. ओम भद्रकाली दशावतार नाट्य मंडळ, पेंडुर यांचे नाटक, २१ रोजी रात्री ८ वा. वळनाथ भजन मंडळ, आडवली-भटवाडीचे बुवा विनायक भिडे (पखवाज-गौरव लाड, तबला-प्रसाद यादव) व ब्राह्मणदेव भजन मंडळ, कातवडचे बुवा मंगेश नलावडे (पखवाज-गौरव चव्हाण, तबला- मनीष डिकवलकर) यांच्यात डबलबारी भजनाचा सामना होणार आहे. सर्वांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाने केले आहे.
