तर भविष्यात केसरकरासाठी होणाऱ्या प्रचारासाठी सभेत जावून त्यांचा खरा चेहरा उघड करणार;ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांचा इशारा
⚡सावंतवाडी ता.०९-: जी विकास कामे केसरकरांना जमली नाहीत ती तेलीनी करून दाखवावी, असे खुल्ले आवाहन ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे. दरम्यान दिपक केसरकर आता खासदारकी किंवा आमदारकीची स्वप्ने पाहत आहेत. त्यासाठी ज्या ठिकाणी केसरकर प्रेस किंवा सभा घेणार त्या ठिकाणी जाऊन केसरकरांचा खरा चेहरा जनते समोर आणणार, असा इशाराही रूपेश राऊळ यांनी केसरकर यांना दिला आहे.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
