आरोप करणे ही विरोधकांची जबाबदारी ….त्यांनी कर्तव्य पार पाडले…!

विकासकामे केल्यामुळेच विरोधकांना पोटसुळ;समीर नलावडे ,बंडू हर्णे यांचा पलटवार

⚡कणकवली ता.०५-: विरोधी पक्ष म्हणून आरोप करणे ही विरोधकांची जबाबदारी आहे आणि आरोप करून त्यांनी आपले कर्तव्य पार पडले त्यात गांभीर्याने घेण्यासारखे काही नाही अशी खिल्ली माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी महाविकास आघाडीची उडविली.आता ५ वर्ष झाल्याने सर्व विरोधी पक्ष एकत्र झाले आहेत.
नगरपंचायतमध्ये एवढे पैसे मिळत असतील तर वैभव नाईक आमदारकी सोडून कणकवलीत नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीला उभे राहतील.असा टोला समीर नलावडे यांनी लगावला आहे.

कणकवली खरेदी विक्री संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष समीर नलावडे ,माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक संजय कामतेकर, विराज भोसले, अभिजीत मुसळे,अजय गांगण आदी उपस्थित होते.

कणकवली भाजी मार्केट येथील स्वच्छतागृह नवीन इमारत बांधकाम आवश्यक असलेल्या अंदाजपत्रकांनुसारच बनवण्यात येत आहे. त्या ठिकाणी इमारतीत तळमजला पुरुष,स्त्रियांसाठी बाथरुम,मोठी आरसीसी वॉटर प्रुप सेफ्टी टॅंक,सेफ्टी वॉल यासारखी कामे होणार आहेत. कणकवलीत विकासकामे केल्यामुळेच विरोधकांना पोटसुळ असल्याचा पलटवार माजी नगराध्यक्ष समीर नलावडे ,माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी पलटवार केला.

बंडू हर्णे म्हणाले, कणकवली
नगरपंचायत कामांवर केलेले आरोप चुकीचे आहेत. स्वच्छतागृह बांधण्याचे काम केले जात आहे,त्याबाबत जनतेला वस्तुस्थिती समजली पाहिजे.गेल्या पाच वर्षात हे विरोधी पक्ष म्हणून काम करत आहेत.राज्यात यांची सत्ता असताना काही बोलू शकले नाही.आमच्या कामाची दखल घेवून राज्यात नगरपंचायतचा एक नंबर आला आहे.त्याबद्दल विरोधकांना पोटशूळ सुटल्याने हे जनतेची दिशाभूल करण्यासाठी बेताल आरोप करत असल्याचे बंडू हर्णे यांनी सांगितले.

सुलभ शौचालय बांधकाम जीएसटी व अन्य कर वगळता अंदाजपत्रक ६९ लाख ९३ हजार आहे.टोटल बांधकाम ८०२ स्क्वेअर फूट आहे.वरचा मजला ५७५ स्क्वेअर फूट असून त्यात पत्रा शेड आणि किचन आहे.त्यामध्ये पुरुष,स्त्रियांसाठी बाथरुम,मोठी आरसीसी वॉटर प्रुफ सेफ्टी टॅंक,सेफ्टी वॉल यासारखी कामे होतील.त्यामुळे खालचा मजला सिव्हील वर्कमध्ये ३६८३ रुपये दराप्रमाणे काम होणार आहे.बाथरूमचे काम आहे,अपंगांसाठी वेगळी व्यवस्था आहे.बाथरुम पुरुषासाठी आणि महीलांसाठी आहे. प्लींथ ते टॉप टोटल टाईल्स आणि ग्रॅनाईट आहेत. डोअर आणि विंडो बाथरूम हे ग्रॅनाईटमध्ये आहे.सीलिंग पीओपी मध्ये आहेत. त्यामुळे या शौचालयाचे काम अत्यंत अद्यावत पद्धतीने केले जाणार असल्याची माहिती बंडू हर्णे यांनी दिली.

शिवसेनेचे खासदार आणि आमदार आहेत , जर चुकीचे काम असेल तर त्यानी खरोखर चौकशी लावावी,आम्ही तयार आहोत. खोटं बोलायचे ते रेटून बोलायचे अशी सवय सुशांत नाईक आणि पारकर यांची आहे.देवाकडे प्रार्थना करूनही सत्तेवर येणार नसल्याने हा विरोधकांचा खटाटोप असल्याचा टोला समीर नलावडे यांनी लगावला.

समीर नलावडे म्हणाले,खासदार आणि आमदार यांनी रेल्वे स्टेशन व गार्डन करणार असा शब्द दिला होता.पारकर आणि नाईक यांनी एस टी स्टँड येथे गाळे देणार असे जाहीर केले होते त्याचे काय झाले? छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा विषयात वैभव नाईक,पारकर यांनी विरोध केला होता.आमच्या ताकदीवर करुन दाखवले.मोर्चाची भाषा करताहेत,या तुम्ही..आम्ही तयार आहोत.

अन्यथा आंदोलन छेडणार:समीर नलावडे

सुशांत नाईक यांच्या टॉवरमध्ये अनेकांनी गुंतवणूक करून लाखो रुपये गुंतवले आहे.मात्र अद्याप आता त्या गाळ्यांची ओसी झालेली नाही त्यामुळे सुशांत नाईक यांनी गुटवणुक धारकांचे पैसे परत करावेत अन्यथा त्या विरोधात मी आंदोलन छेडणार आहे.असा इशारा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिला.लोकांची फसवणूक केली आहे,असा आरोप समीर नलावडे यांनी केला.

You cannot copy content of this page