भाजपा वेंगुर्लेच्या वतीने वेगवेगळ्या पदावर विराजमान झालेल्या तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार

⚡वेंगुर्ले ता.०५-: भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा तसेच तालुकास्तरीय विविध संस्थांवर नियुक्ती झाल्याबद्दल तालुका कार्यालयात सत्कार करण्यात आला.यामध्ये सिंधुदुर्ग भंडारी पतपेढी – वेंगुर्लेच्या चेअरमन पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर यांचा सत्कार करण्यात आला.

तसेच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर तसेेच तालुका चिटणीस सौ.सुजाता देसाई यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला .तसेच महीला मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीस सौ.सारिका काळसेकर व ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष रमेश नार्वेकर यांची सिंधुदुर्ग भंडारी पतपेढी , वेंगुर्ले च्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.
या सत्कारा प्रसंगी बोलताना जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई म्हणाले कि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची ” चप्पा चप्पा भाजपा ” ही घोषणा वेंगुर्ले तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी सत्यात उतरवून दाखवली आहे. कारण तालुक्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे , व हे पक्षासाठी भूषणावह आहे.त्यामुळेच सर्वांचे कौतुक करावे तेवढे थोडे . अशा पद्धतीने सर्व सत्तास्थाने भाजपा कार्यकर्त्यांनी पादाक्रांत करावी अशा शुभेच्छा दिल्या .
यावेळी सत्कारमुर्ती बाबली वायंगणकर व प्रसाद पाटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले व पक्षाने केलेल्या सत्कारामुळे आता आणखी जबाबदारी वाढल्याचे सांगीतले , तसेच भविष्यात भाजपा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले .
यावेळी तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर , जिल्हा चिटणीस निलेश सामंत , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व बाळा सावंत , ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर व बाबली वायंगणकर , महीला अध्यक्षा स्मिता दामले , शक्तीकेंद्र प्रमुख विजय बागकर – महादेव नाईक – सुधीर गावडे , किसान मोर्चाचे बाळु प्रभु , पालकरवाडी सरपंच सदाशिव उर्फ बंड्या पाटील , माजी सरपंच विजय रेडकर , रविंद्र शिरसाठ , शेखर काणेकर , उदय गावडे , श्रीधर गोरे , देवेंद्र वस्त , वृंदा मोर्डेकर , रसिका मठकर तसेच इतर कार्यकर्ते उपस्थित होते .

You cannot copy content of this page