देवगडचे दिवाणी न्यायालय स्थलांतरित

जुन्या तहसिल कार्यालयातुन होणार कामकाज

देवगड ता.०४-: देवगड दिवाणी न्यायालयाच्या सद्यस्थितीत असलेल्या इमारतीच्या जागी नवीन इमारत हाेणार असल्याने
देवगड दिवाणी न्यायालय एसटी स्टॅण्ड समाेरील तहसिल
कार्यालयानजिक असलेल्या जुन्या तहसिल
कार्यालयाच्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात
आले असून ८ मे पासून त्या इमारतीमध्ये न्यायालयीन
कामकाजाला सुरूवात हाेणार आहे.


सध्या कार्यरत असलेल्या देवगड दिवाणी न्यायालयाची
इमारत ही जुनी झाली असून ती पाडून
त्या जागी नवीन इमारत उभारण्यात येणार आहे
यासाठी बांधकाम विभागाकडून 33 काेटी
रूपयाचे अंदाजपत्रक प्रशासकीय मंजुरीसाठी
पाठविण्यात आले आहे. जुनी इमारत पाडून नवीन
इमारतीच्या बांधकामाला सुरूवात हाेणार आहे.
यामुळे देवगड न्यायालयाची तात्पुरती व्यवस्था
देवगड तहसिल कार्यालया
नजिक असलेल्या जुन्या
तहसिल कार्यालयाच्या इमारतीमध्ये करण्यात आले
आहे.ही इमारतही न्यायालयीन कामकाजासाठी सुसज्ज
करण्यात आली असून या इमारतीमध्ये ८ मे पासुन
न्यायालयीन कामकाजाला सुरूवात हाेणार आहे.
याची नाेंद वकीलवर्ग, पक्षकार व जनतेने घ्यावी असे
आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page