देवगड
देवगड आगारातून सकाळी ९.०० वाजता सुटणारी देवगड तुळजापूर बस फेरीचा कोल्हापूरच्या अलीकडे दोनवडे फाटा येथे समोरून येणाऱ्या टू व्हीलर ला धडक दिल्याने मोटर सायकलवर मागे बसलेल्या अरुंधती बाळासाहेब पाटील व ४८ यांचा जागीच मृत्यू झाला आहे सदरची घटना बुधवारी दुपारी १.१५ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, देवगड आगारातून बुधवारी सुटलेली देवगड तुळजापूर बस फेरी गाडी क्रमांक एम एच २० बी एल २९११ ही प्रवासी फेरी. चालक महेंद्र संतोष पाटील व वाहक कृष्णा पोपट बारगजे हे तुळजापूर प्रवासी फेरीवर आपली सेवा बजावत असताना कोल्हापूरच्या अलीकडे दोनावडे फाटा येथे समोरून येणाऱ्या टू व्हीलर ला धडकल्याने टू व्हीलर च्या मागील बसलेल्या अरुंधती बाळासाहेब पाटील वय ४८ यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर बाळासाहेब आकाराम पाटील व ५१ हे गंभीर जखमी झाले असून सुमारे टू व्हीलर चे २५ हजाराहून अधिक रुपयाचे नुकसान झाले आहे तर एसटीच्या दर्शनी भागाचे किरकोळ नुकसान झाले असून यामध्ये प्रथम दर्शनीय रापचलक जबाबदार असल्याचे बोलले जात आहे घटनेचा अधिक तपास करवीर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून कोल्हापूर येथील संभाजीनगर आगार व्यवस्थापक शिवराज बयाजीराव जाधव यांनी कार्यवाही पूर्ण केली आहे घटनेची माहिती मिळताच दोनवडे गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदतीसाठी धावून आले.
