विहिरीवर पंप बसवत नळाद्वारे दिली पिण्याचे पाणी
सावंतवाडी
तालुक्यातील कुणकेरी रेवीचे भाटले येथे पिण्याच्या पाण्याची तिव्र टंचाई भासल्याने वाडीवरील ग्रामस्थांनी एका निवेदनाव्दारे सावंतवाडी मतदार संघाचे आमदार तथा शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांचे लक्ष वेधले असता स्वखर्चातून सहकार्य करुन कुणकेरी रेवीचे भाटले येथील वाडीवर ओपन विहिरीवर पंप बसवून पिण्याच्या पाण्याची नळाव्दारे सोय करण्यात आली.
सदर नळयोजनेचा शुभारंभ शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे, गजानन नाटेकर, शिवसेना कोलगांव विभागप्रमुख महेश ऊर्फ पप्पू सावंत, कुणकेरी शाखाप्रमुख बाळा परब, उपशाखाप्रमुख मानाजी कुणकेरकर, बुधाजी गावडे, एस. आर. परब, नाना परब, बाबु परब, बाबल परब, आशिष परब, दिनेश परब, प्रमोद गावडे, बाबु रामा परब, गणपत रामा परब, मधुकर रामा परब, महीला व वाडीवरील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करुन दिल्याबद्दल महीला भगिनींकडून मंत्री केसरकर यांचे आभार मानले आहेत.
