मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड येथील अपघातात सिंधुदुर्गातील एक ठार, एक गंभीर

⚡देवगड ता.०३-: मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड येथील अपघातात सिंधुदुर्गातील एक ठार, एक गंभीर झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तारामुंबरी येथील पती-पत्नी बोलेरो पिकअपने वाशी येथे आंबे विक्रीसाठी जात होते. त्यावेळी रायगड येथे मुंबई गोवा महामार्गावर सिलेंडर ट्रकला पाठिमागून बोलेरो चालकाने जोरदार धडक दिली. हा अपघात पेणजवळील हमरापूर येथील ब्रीजवर बुधवारी पहाटे घडला. या अपघाता पत्नी जागीच ठार झाली आहे तर पती गंभीर जखमी झाला आहे. अपघातात बोलेरे वाहनाचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.


मुंबई – गोवा महामार्गावर पेणजवळील हमरापूर फाटा येथील ब्रीजवर भरधाव बोलेरो पिकअपने पुढे जाणार्‍या एच. पी. गॅस सिलेंडर घेऊन जाणार्‍या ट्रकला मागून धडक दिली. या अपघातात बोलेरो पिकअपमधील 1 जण ठार तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत माहिती अशी कि, फिर्यादी सुमित चंद्रकांत खवळे, रा. तारा, मुंबरी देवगड जि. सिंधदुर्ग हे बुधवार दिनांक 3 मे रोजी आपल्या ताब्यातील महिंद्रा बोलेरो पिकअप क्रमांक एम.एच. 07 ए.जे. 2682 यामध्ये देवगडवरून मुंबईला वाशी मार्केटला आंबे विक्री साठी घेऊन जात असताना पहाटे 4 : 15 च्या सुमारास पेणजवळील हमरापूर फाटा येथील ब्रीजवर आले असता पुढे असणार्‍या पनवेल बाजूकडे एच. पी. गॅस घेऊन जाणार्‍या ट्रक क्रमांक एमएच 12 ई.क्यू. 2208 याला ओव्हरटेक करीत असताना या ट्रकचालकाने ट्रक लेनवरून बाहेर काढल्याने भरधाव ट्रकला पीकअपने क्लिनर बाजूकडून जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता कि, बोलेरो पीकअप व अपघातग्रस्त हे ट्रकच्या मागच्या बाजूस अडकून पडले होते.
या अपघातात बोलेरो चालक सुमित चंद्रकांत खवळे वय( 28) रा. तारा, मुंबरी, देवगड हा गंभीर जखमी झाला तर त्याची पत्नी स्पृहा सुमित खवळे वय (24) रा. तारा, मुंबरी, देवगड ही जागीच ठार झाली.
यावेळी अपघातस्थळी दोन्ही वाहने एकमेकांत अडकून असल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघाताचे वृत्त कळताच अपघातग्रस्तांचे वाली कल्पेश ठाकूर यांनी रुग्णांना आपल्या रुग्णवाहिकेतून तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यावेळी दादर सागरी पोलीस व पेण पोलीसांनी घटनास्थळी जावून अडकलेल्या दोन्ही वाहनांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास दादर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सतिश पाटील हे करीत आहेत.

You cannot copy content of this page