अबिद नाईक, उद्या सिल्वर ओकवर शरद पवारांची भेट घेऊन कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचवणार…_
⚡कणकवली ता.०२-: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार साहेबांचे नेतृत्व नसेल तर सक्रिय राजकारणात आम्ही तरी काय करायचे ? पवार साहेबांचा हा निर्णय आमच्यासाठी अत्यंत वेदनादायी असल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाध्यक्ष पद सोडत राजकीय संन्यास घेण्याचे जाहीर करताच त्याचे पडसाद राज्यभरात उमटले. शरद पवार साहेबांनी घेतलेला हा निर्णय आमच्या सारख्या निष्ठावान कार्यकर्त्याच्या मनाला वेदनादायी आहे. अशी प्रतिक्रिया सिंधुदुर्ग राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी दिली. 3 मे रोजी मुंबईत सिल्व्हर ओक या पवार यांच्या निवासस्थानी जाऊन शरद पवार यांची भेट घेत सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवणार असून आपला निर्णय मागे घेण्याची आग्रही विनंती करणार असल्याचेही अबिद नाईक यांनी सांगितले.
