अन्नपूर्णावाडी ते देऊळवाडी रस्त्याचा समावेश
बांदा/प्रतिनिधी
वाफोली येथील अन्नपूर्णावाडी ते देऊळवाडी या रस्त्याच्या कामाचा आज माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आला.
त्यानंतर वाफोली ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांची श्री तेली यांनी भेट घेत गावातील विकाकामांबाबत चर्चा केली. यावेळी देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस यांच्या हस्ते श्री तेली यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी केंद्र तसेच राज्य शासनाच्या विविध लोकोपयोगी योजनांची माहिती देत प्रत्येक योजना ही तळागाळात व घराघरात पोहोचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन राजन तेली यांनी याठिकाणी दिले.
यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, पोलीस पाटील आना उर्फ राजन गवस, ग्रामसेवक प्रसाद ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य अमित कळंगुटकर, सदस्या मंजुळा शेगडे, साक्षी शिरोडकर, सोसायटी चेअरमन धनश्री गवस, व्हा. चेअरमन अनिल गवस, माजी सरपंच मारुती गवस, अंकुश गवस, सचिन गवस, रामा गवस, एकनाथ नाडकर्णी, सुधीर दळवी, महेश धुरी, महेश गवस, गणेश गवस, महेंद्र गवस, ग्रामपंचायत कर्मचारी संदीप धुरी, लवू कांबळे, अंगणवाडी सेविका तृप्ती परब, आशा सेविका ऋतुजा गवस, बापू राणे, बाबली गवस, रविना कांबळे, मुग्धा पाटील, संगीता गवस, उज्वला कांबळे आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
