रोट रँक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदाचा उपक्रम

पणदूर संविता आश्रमाला दिल्या जीवनावश्यक वस्तू

बांदा/प्रतिनिधी
रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदाच्या वतीने पणदूर येथील संविता आश्रमला जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. यावेळी रोटरॅक्टच्या सदस्यांनी आश्रमाविषयी माहिती व आश्रमाची दिनचर्या जाणून घेतली.
यावेळी रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय मयेकर, उपाध्यक्ष संकेत वेंगुर्लेकर, सचिव अवधूत चिंदरकर, सहसचिव मिताली सावंत, खजिनदार गार्गी विर्नोडकर, मुईन खान, साईस्वरूप देसाई, अमित धोंगडे, अक्षय कोकाटे आदी उपस्थित होते. तसेच रोटरी क्लबचे राजु बिले व राजन बोभाटे उपस्थित होते. भविष्यात आश्रमाला सर्वसमावेशक भरीव मदत करण्याचे आश्वासन अध्यक्ष अक्षय मयेकर यांनी यावेळी दिले.
फोटो :-
पणदूर येथील सविता आश्रमाला जीवनावश्यक साहित्य देताना बांदा रोटरॅक्ट क्लबचे पदाधिकारी.

You cannot copy content of this page