मळेवाड सांस्कृतिक पर्यटन महोत्सवाचे युवराज लखमराजे करणार उद्घाटन

आज रात्री होणार प्रारंभ: विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आयोजन

⚡सावंतवाडी ता.०२-: मळेवाडीतील भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 चा आज शानदार शुभारंभ सावंतवाडीचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते आज होणार असून यानिमित्त वर्गात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे आयोजित भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 चा शुभारंभ आज रात्रौ 08:30 वाजता संपन्न होणार आहे.या शुभारंभ प्रसंगीयुवराज लखन राजे भोसले व भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली हे उपस्थित राहणार आहेत.तसेच भव्य सांस्कृतिक पर्यटन महोत्सव 2023 मध्ये आज भव्य खुली जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा,वेशभूषा स्पर्धा,तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रम राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाडा शाळा नंबर 1 च्या पटांगणावर आयोजित करण्यात आला आहे.तरी रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

You cannot copy content of this page