⚡मालवण ता.२४-: छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त सारथी, पुणे यांच्यावतीने
प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी तालुका स्तरावर घेण्यात आलेल्या निंबध स्पर्धेत प्राथमिक गटात मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलमधील तन्मय महेश परब (इयत्ता ५ वी) याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
सारथी, पुणे यांच्यावतीने छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी वर्षानिमित्त प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये तालुकास्तरावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात मालवण तालुकास्तरीय निबंध स्पर्धेच्या प्राथमिक गटात मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुलमधील तन्मय महेश परब (इयत्ता ५ वी) याने प्रथम क्रमांक पटकावीला आहे.
तन्मय परब याच्या या यशाबद्दल भंडारी हायस्कुलचे मुख्याध्यापक वामन खोत, संस्था अध्यक्ष विजय पाटकर, संस्था पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
