मालवण शहरात सुरु होणार गटार सफाईचे काम

व्यापारी व नागरिकांनी सहकार्य करण्याचे नगरपरिषदेकडून आवाहन

⚡मालवण ता.२४-: मालवण शहरातील गटारे, नाले व व्हाळी यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाई करण्यासाठी मालवण नगरपालिकेने काढलेल्या ई निविदेला तिसऱ्या प्रयत्नात प्रतिसाद मिळून संबंधित ठेकेदाराची निविदा मंजूर करून कार्यारंभ चे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार शहरात गटार साफसफाई काम सुरु होणार असून काम सुरु असताना त्यात आपल्या कोणत्याही साहित्याचा अडथळा होऊ नये याची काळजी व्यापारी, दुकानदार, नागरिकांनी घ्यावी, तसेच सफाई केलेल्या गटारात कचरा टाकू नये, असे आवाहन मालवण नगरपरिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

मालवण शहरात गटार सफाई सारखे नागरिकांच्या आरोग्याचे व सार्वजनिक हिताचे काम योग्यरित्या पुर्ण करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. नाले व गटारे स्वच्छता कामी आपल्या कोणत्याही साहित्याचा अडथळा होणार नाही याची दक्षता व्यापारी व नागरिकांनी घ्यावी. या कामाबाबत कोणतीही हरकत अथवा सुचना असल्यास तात्काळ या कामावरील नगरपरिषद च्या सुपरवायजरच्या निदर्शनास आणावी किंवा लेखी स्वरुपात नगरपरिषद कडे दाखल करावी. काम पुर्ण झाल्यानंतर मागावून प्राप्त होणाऱ्या तोंडी तक्रारीची दखल घेता येणार नाही असेही नगरपरिषदेने म्हटले आहे.

कोणत्याही परिस्थितीत गटार सफाई कामात कोणताही अडथळा होणार नाही याची दक्षता सर्वांनी घेवून पावसाळ्यापूर्वी शहरातील नाले, गटारे स्वच्छतेची सार्वजनिक हिताची कामे योग्यरित्या करण्यासाठी नागरिकांनी नगरपरिषदेला सहकार्य करावे. नाले, गटारे स्वच्छ केल्यानंतर त्यामध्ये कोणताही कचरा/डेब्रीज टाकू नये. स्वच्छ केलेल्या नाले, गटारे यामध्ये कोणीही कचरा टाकतांना दिसुन आल्यास त्याला अटकाव करुन याबाबतची माहिती व फोटो नगरपरिषदकडे द्यावी;जेणेकरुन अशा उपद्रवी प्रवृत्ती विरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल अधिनियम २०१७ नुसार, योग्य ती कायदेशीर कारवाई करणे नगरपरिषदेला शक्य होईल, असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

You cannot copy content of this page