⚡बांदा ता.२४-: क्रांतीसूर्य भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132व्या जयंतीनिमित्त पाडलोस-शितलवाडी येथे मंगळवार 25 व बुधवार 26 एप्रिल रोजी भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळपासून विविध कार्यक्रम, दुपारी 12.30 वा. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक, दुपारी 2.30 ते संध्या.6 वाजेपर्यंत महिला व मुलांचे विविध खेळ, रात्री 9 वा. ‘देखणी बायको प्रेमाची’ विनोदी नाटक सादर करण्यात येणार आहे. बुधवार 26 रोजी रात्री 8.30 वा. गावातील मुलांचा, महिलांचा व हौशी कलाकारांचा नाच-गाण्याचा कार्यक्रम ‘जल्लोष’ पार पडणार आहे. सर्व कार्यक्रमांचा पाडलोस गावासह परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सिद्धिविनायक कला, क्रीडा मंडळ-शितलवाडी पाडलोसतर्फे करण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त पाडलोसमध्ये उद्यापासून कार्यक्रम
