शिवसेनेतर्फे २७ रोजी विनाफटका बैलगाडी शर्यतीचा धुरळा उडणार

⚡कणकवली ता.२४-: कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने २७ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३ वाजता जानवली वायंगवडेवाडी येथे विनाफटका बैलगाडी शर्यत स्पर्धा आयोजीत केली आहे.
या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता अनुक्रमे २० हजार, १५ हजार, १० हजार अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. जिल्हास्तरीय सस्पर्धेकरिता अनुक्रमे १५ हजार, १० हजार आणि ७ हजा अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत.स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार सुधीर सावंत यांच्या हस्ते होईल. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, अशोक दळवी, महिला आघाडी जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी शालेय शिक्षण मंत्री ना.दिपक केसरकर उद्योगमंत्री ना.उदय सामंत, आमदार रविंद्र फाटक, उद्योजक किरण सामंत आदी उपस्थित राहणार आहेत.
अधिक माहितीसाठी
दामू सावंत (9404441919)
महिंद्र सावंत ( 9420335758)
भूषण परुळेकर( 9373893313)
मारुती सावंत ( 9422373213) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page