Headlines

बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त २२ रोजी कणकवलीत विविध कार्यक्रम

कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे वीरशैव लिंगायत समाजातर्फे आवाहन…!

⚡कणकवली ता.२०-: लिंगायत समाजाचे आराध्य दैवत श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती कणकवलीतील लिंगायत समाजाच्यावतीने शनिवार २२ एप्रिलला कांबळीगल्लीतील नियोजित लिंगायत समाज मंदिराच्या जागेत साजरी केली जाणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी ११ वाजता श्री गणेश पूजा, श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन, १२ वा. श्री बसवेश्वर महाराजांचा जन्मसोहळा, दुपारी १ वा. तीर्थप्रसाद वाटप, सायंकाळच्या सत्रात समाजातील महिलांसाठी फनीगेम्स, उखाणे स्पर्धा, वन मिनिट गेम, प्रश्नमंजूषा आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी समाजबांधवांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वीरशैव लिंगायत समाजातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page