प्राथमिक शिक्षक मारुती आचरेकर यांचा मृतदेह मिळाला गळफास स्थितीत

मालवण दि प्रतिनिधी
आचरा टेंबली वरचीवाडी येथील रहिवासी आणि प्राथमिक शिक्षक मारुती प्रभाकर आचरेकर वय ५७ यांचा मृतदेह सोमवारी सायंकाळी त्यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या शेत मांगराच्या छप्पराच्या लाकडी वाशाला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.

याबाबतची खबर त्यांचा पुतण्या गणेश आनंद आचरेकर याने आचरा पोलीस स्टेशनला दिली आहे. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट होवू शकले नाही. मनमिळावू आणि नेहमी सहकार्यास तत्पर म्हणून मारुती आचरेकर यांची ओळख होती. ते सध्या बांदिवडे मळेवाड प्राथमिक शाळेत कार्यरत होते. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी झटणारा शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती.त्यांना शेतीची आवड होती. त्यांच्या आकस्मिक मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुली,मुलगा, भाऊ,बहिण, असा मोठा परिवार आहे. अँड सायली आचरेकर यांचे ते वडील होत.अधिक तपास आचरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शंकरराव कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकान्स्टेबल कांबळे करत आहेत.

You cannot copy content of this page