डंपरच्या धडकेत जिल्हा न्यायालयाच्या वरिष्ठ लिपिक ठार…

झाराप झिरो पाँईट येथील घटना ; रुग्णालयात मोठी गर्दी

⚡सावंतवाडी ता.१७-: भरधाव डंपर ने धडक दिल्याने जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ लिपिक सुषमा गणपत नेमण (52) रा. मातोंड पेडूर या ठार झाल्या. हा अपघात आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबई गोवा महामार्गावर झारा झिरो पॉईंट येथे घडला. घटनेची माहिती समजतात येथील उपजिल्हा रुग्णालयात न्यायालयातील कर्मचारी तसेच बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की सौ.नेमण या आज सायंकाळी न्यायालयातील काम संपवून आपल्या सहकाऱ्यांसमवेत मोटर सायकलने झरा झिरो पॉईंट येथे उतरले त्यांना त्यांचा मुलगा न्यायला येत होता. त्या रस्ता क्रॉस करत असताना कुडाळ वरून भरधाव वेगात सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या डंपरची धडक बसली या त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तात्काळ 108 रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्या मयत झाल्या. अपघात होताच डंपर चालकाने घटनास्थळावरून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा न्यायालयीन कर्मचारी तसेच अन्य न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड परिमल नाईक तसेच ॲड.शामराव सावंत ॲड.संदिप निंबाळकर ॲड.अमोल ॲड.कविटकर ॲड.अनिल निरवडेकर आदींनी गर्दी केली होती. त्या पूर्वाश्रमीच्या माजगाव म्हालटकरवाडा येथील होत्या. त्यांनी लिपिक म्हणून सावंतवाडी वेगुर्ले येथेही काम केले होते सद्यस्थितीत त्या जिल्हा न्यायालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत होत्या.

You cannot copy content of this page