⚡कणकवली ता.१७-: कणकवली शहरातील टाक्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या किरकीची कोंड येथील पाणी साठा संपल्याने कणकवली शहराला होणारा पाणी पुरवठा 18 व 19 एप्रिल 2023 या दिवशी बंद राहणार आहे. शिवडाव धरणातून पाणी सोडण्यात आले असून पाणी पोहचण्यास सुमारे दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे.
पाणी उपलब्द्ध होताच पाणी पुरवठा पूर्ववत चालू करण्यात येईल. याची नागारिकांनी व नळ कनेक्शन धारकांनी नोंद घेऊन नगरपंचायतीस सहकार्य करावे.असे आवाहन कणकवली नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांनी केले आहे
