डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशात न्यायव्यवस्था जीवंत:महेश काणेकर

⚡कणकवली ता.१७-: डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे देशात न्यायव्यवस्था जीवंत असल्याचे प्रतिपादन कवी ,लेखक ,विचारवंत महेश काणेकर यांनी केले.
नक्षत्राचं देणं काव्यमंच विभाग सिंधुदुर्ग आयोजीत डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२व्या जयंती दिनी काव्यमैफल पूर्णा लोक सेवा संघ कसवण येथे संपन्न झाली त्यावेळी कवी ,लेखक ,विचारवंत महेश काणेकर अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
बाबासाहेबांच्या
कष्ट व त्यागाचा उहापोह केला.काव्यमैफलचे उद्घाटन कसवण तळवडे गावचे सरपंच मिलिंद सर्पे यांचे हस्ते झाले त्यावेळी प्रमुख पाहुणे कवी सुरेश पवार,उपसरपंच भाई सावंत, माजी सरपंच विलास गावकर, माजी उपसरपंच मनोहर मालंडकर, शाखाप्रमुख संतोष गुरव, ग्रामसेविका राधिका आचरेकर, तसेच मुख्याध्यापक किशोर गोसावी अंगणवाडी सेविका,शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच ग्रामस्थ उपस्थित होते . लोकांमधील अंधश्रद्धा दूर व्हावी म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक.विजय चौकेकर यांनी अंधश्रद्धा निर्मुलनवर प्रात्यक्षिकद्वारे पटवून दिले.शालेय विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध कवींच्या कवितेचे वाचन केले.काव्यमैफलीत कवी कृष्णा गवस,राजेंद्र गोसावी,अमित राऊळ,दिपक तळवडेकर,सुरेश पवार,सोमा गावडे यांनी बहारदार कवितांचे वाचन करून रसिकांची दाद मिळवली.तसेच युवारंजन कणकवली यांनी ‘भिमाची सावली, हे गीत गीतकार प्रकाश मालंडकर लिखीत व गायक राकेश मिठबांवकर रिदम संयोजन शेखर सर्पे संगीत साथ चिन्मय सावंत, सुजित सामंत ,श्रीधर पाचंगे यांनी स्वरबद्ध केलेल्या गिताचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.जिल्हाध्यक्ष कवी उदय सर्पे यांनी काव्यमंचाची वाटचाल आणि उपक्रम यांची माहीती दिली.शेवटी आभाराने काव्यमैफलची सांगता झाली.

You cannot copy content of this page