मालवणात मुलांसाठी पारंपारिक खेळ शिबीराचे आयोजन

⚡मालवण ता.१५-: बॅ. नाथ पै सेवांगण मालवण आणि कोकण वैभव समृद्धी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पहिली ते सहावी पर्यंतच्या मुलांसाठी पारंपारिक खेळ शिबीर दि. १७ ते २१ एप्रिल या कालावधीत सायंकाळी ४.३० ते ६ यावेळेत बॅ. नाथ पै सेवांगण धुरीवाडा मालवण येथे आयोजित करण्यात आले आहे.

हे शिबीर मोफत असून मुलांना पारंपारिक खेळांची ओळख आणि आवड निर्माण होण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांना या शिबिरात सहभागी करावे. सहभागासाठी नावनोंदणी आवश्यक असून मुलांच्या नावनोंदणी साठी ९४२३९४६००३ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page