कुडाळ येथे १४ मे रोजी जिल्हास्तरीय ग्रंथालय कर्मचारी मेळावा

⚡मालवण ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय कर्मचाऱ्यांची सभा शुक्रवारी श्री. अनिल शिवडावकर यांच्या कुडाळ येथील निवासस्थानी संपन्न झाली. यावेळी १४ मे रोजी जिल्हास्तरीय एकदिवसीय ग्रंथालय कर्मचारी मेळावा महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे घेण्याचे निश्चित करण्यात आले.

या मेळाव्यामध्ये ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय काही प्रमुख नेते उपस्थित राहणार असून ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या विविध समस्यांबाबत या मेळाव्यात चर्चा होणार आहे व शासन दरबारी असलेल्या विविध प्रश्न सोडविण्याच्या दृष्टिने सनदशीर मार्गाने आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्या तील प्रत्येक तालुका ग्रंथालयाने आपल्या स्तरावर तालुक्यातील ग्रंथालय कर्मचाऱ्यांची एक सभा आयोजित करून मेळाव्याबाबत माहिती द्यावी. या मेळाव्यासाठी जिल्हयातील १२९ ग्रंथालयाच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. संजय शिंदे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page