पत्नी सौ.सुहासी चव्हाण यांचे प्रतिपादन
बांदा/प्रतिनिधी
जीवनात यशस्वी होण्यासाठी कुलदेवतेचा व ग्रामदैवतेचा आशीर्वाद हा महत्वाचा असतो. कुठल्याही क्षेत्रात प्रगती करत असताना अध्यात्म हे खुप गरजेचे आहे. पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या यशस्वी राजकीय प्रवासात देखील अध्यात्मचे योगदान आहे असे प्रतिपादन पालकमंत्री श्री चव्हाण यांच्या सौभाग्यवती सौ. सुहासी रवींद्र चव्हाण यांनी केले.
बांद्याचे माजी सरपंच अक्रम खान यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी खान दांपत्याने सौ. चव्हाण यांचे औक्षण करून स्वागत केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळु सावंत, माजी सदस्य मकरंद तोरसकर, अन्वर खान, ज्ञानेश्वर सावंत, विनोद राऊळ, कमलाकर धुरी आदी उपस्थित होते.
यावेळी सौ. चव्हाण यांनी अध्यात्म व धार्मिक संस्कृती याबाबत सखोल व सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. यावेळी घराचे वास्तुशास्त्र यावर देखील त्यांनी भाष्य केले.
