हवालदार फकरुद्दीन आगा यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती

⚡देवगड ता.११-: येथील पोलीस स्थानकात हवालदार पदी सेवा बजावीत असलेले फकरुद्दीन गुलाबसो आगा यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे .या बद्दल देवगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी वर्गाने विशेष अभिनंदन केले आहे.फकरुद्दीन आगा यांनी १९९१ साली सावंतवाडी मुख्यालय येथे सेवेस प्रारंभ करून त्यानंतर १९९७ साली देवगड पोलीस स्थानक
२००६साली वैभववाडी पोलीस स्थानक,तेथून २०१३विजयदुर्ग पोलीस स्थानक,आणि पुन्हा २०१९ साली देवगड पोलीस स्थानक याठिकाणी सेवा बजावीत एप्रिल २०२३ मध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहचले आहेत.

देवगड विजयदुर्ग वैभववाडी तिन्ही पोलीस स्थानकात त्यांनी वाहतुक पोलीस म्हणून महत्वपूर्ण कामगिरी बजावली असून इतर गुन्ह्यातील तपास काम ही यशस्वी पणे पार पाडले आहे.त्यांच्या पदोन्नती बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

You cannot copy content of this page