महाप्रबंधक अजय अरोरा यांचे गौरउद्गार
मालवण दि प्रतिनिधी
गेली दोन वर्षे मालवणच्या धक्का मित्रमंडळाने रक्तदान शिबिरे आयोजित करून जी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे ती कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन नागरी संरक्षण संस्था पश्चिम रेल्वेचे अध्यक्ष व वरिष्ठ उपरेल चर्चगेटचे महाप्रबंधक अजय अरोरा यांनी येथे बोलताना केले
मालवण येथील धक्का मित्रमंडळातर्फे मामा वरेरकर नाट्यगृहात आज आठवे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्याचे उदघाटन
वरिष्ठ उपरेल चर्चगेटचे महाप्रबंधक अजय अरोरा यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले त्यावेळी ते बोलत होते रुग्णांना भासणारी रक्ताची आवश्यकता तसेच जिल्हा रक्त पेढीतील रक्त पुरवठ्याची कमतरता लक्षात घेऊन मालवण मधील धक्का मित्रमंडळ सातत्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करत असते.
यावेळी रेल्वेचे प्रशांत कोरान्ने व राजेश शर्मा यांच्यासह डॉ अनुप पळसंबकर डॉ वस्त, डॉ अमृता पाटील, धक्का मित्र मंडळ मालवणचे हेमंत शिरगांवकर, बाबू डायस, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल देसाई, भूषण पिसे, देवा तोडणकर, नितेश जाधव, रोहित चव्हाण, नितीन कोटीयान, हॉटेल बांबूचे मालक संजय गावडे, राहुल केळूसकर, गौरेश कांबळी, महेंद्र पारकर, अनिकेत चव्हाण, केशव साठे, स्वप्नील कदम, अस्लम अथनीकर, दीपिका तोडणकर, आदेशा काळसेकर आदी व इतर उपस्थित होते.
या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभून ८० रक्तदात्यांनी रक्तदान केले.
