सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळेचे उद्घाटन

⚡सिंधुदुर्गनगरी,ता.११-: येथील शासकीय विश्रामगृह परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‍दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळेचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.

पालकमंत्री श्री. चव्हाण यांच्या हस्ते ‍दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळेच्या कोनशिलेचे अनावरण प्रथम करण्यात आले. यानंतर फित कापून उद्घाटन करण्यात आले.उद्घाटनानंतर प्रयोगशाळेची पाहणी करुन पालकमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजय सर्वगोड, माजी आमदार राजन तेली,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, दक्षता व गुणनियंत्रण प्रयोगशाळेचे सहायक संशोधन अधिकारी राजेश चौधरी, उपअभियंता संजय दहीफळे, बांधकाम विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
सोबत : फोटो जोडला आहे
00000

You cannot copy content of this page