जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी फोडला नारळ
⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी तालुक्यातील निगुडे ग्रामस्थांच्या मागणीनुसार राज्याचे शालेय शिक्षण श्री. दिपकभाई केसरकर यांच्या आमदार निधीतून निगुडे माऊली मंदिर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणासाठी ७ लाखाचा निधी मंजूर केला असून त्याचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
त्यावेळी शिवसेना तालुका प्रमुख श्री. नारायण ऊर्फ बबन राणे, गावचे प्रमुख मानकरी शांताराम गावडे, सावंतवाडी खरेदी विकी संघाचे व्हाईस चेअरमन श्री. राजन रेडकर, शिवसेना इन्सुली विभागप्रमुख राजन परब, निगुडे शाखाप्रमुख सिद्धीविनायक गावडे, निगुडे माजी सरपंच समीर गावडे, ग्रा.पं. सदस्य रवींद्र गावडे, माजी उपसरपंच श्री. गुरुदास गवंडे, महिला शाखा प्रमुख सौ. शर्मिला नाईक, मेहश सावंत, देवस्थान समिती अध्यक्ष सत्यवान राणे, नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष नारायण राणे, शिवा सावळ, सौ. गौरवी गावडे, पंढरीनाथ राणे, सुधीर गावडे, जीजी गावडे, सौ. ममता नाईक, विलास सावंत, नारायण गावडे, संदिप नाईक, दिपक गावडे, अरविंद नाईक, पुरुषोत्तम गावडे, आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल निगुडा माऊली मंदिर मानकरी व ग्रामस्थांनी श्री. दिपकभाई यांचे आभार मानले आहेत.
