*हृदय विकाराच्या धक्क्याने राहत्या घरी झाले निधन
*💫कणकवली दि.१९-:* कणकवली कॉलेज चे माजी प्राध्यापक तथा आर्टस अँड कॉमर्स कॉलेज पाचल चे विद्यमान प्राचार्य डॉ.खंडेराव कोतवाल यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने कणकवली येथील राहत्या घरी शुक्रवारी दुपारी निधन झाले.त्यांचा मृतदेह पुणे राजगुरूनगर येथील मूळगावी नेण्यात आला असून राजगुरूनगर येथे उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. मागील 3 वर्षांपासून पाचल येथील कॉलेजमध्ये प्रचार्यपदी कार्यरत असलेल्या डॉ. खंडेराव कोतवाल यांनी कणकवली कॉलेजमध्ये 30 वर्षे प्राध्यापक पदी काम केले होते. कॉलेजचे एन एस एस विभागप्रमुख म्हणूनही त्यांनी यशस्वी काम पाहिले होते. बिझनेस मॅनेजमेंट अँड अकौंटनसी हे विषय ते विद्यार्थ्यांना शिकवत असत. कणकवली कॉलेजमध्ये वाणिज्यविभागप्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते.विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांनी नावलौकिक कमावला होता. शुक्रवार 19 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास अचानक त्यांना कणकवली विद्यानगर येथील राहत्या घरात हृदयविकाराचा मोठा झटका आला. तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. कणकवली शहरातील जि.प.शाळा नं 3 च्या पदवीधर शिक्षिका प्रतिभा कोतवाल यांचे ते पती होत. त्यांच्या पश्चत मुलगा, विवाहित मुलगी, जावई असा परिवार आहे.
