आरती कोडचवाडकर ठरल्या खेळ पैठणीच्या मानकरी

रामनवमी निमित्त करण्यात आले होते आयोजन

मालवण (प्रतिनिधी)

मालवण गवंडीवाडा येथील श्री राम मंदिरात रामनवमी उत्सवनिमित्त श्री राम मंदिर मित्रमंडळ व श्री समर्थ रामदास प्रासादिक नाट्यमंडळ यांच्यावतीने आयोजित आणि सौरभ ताम्हणकर मित्रमंडळ पुरस्कृत ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेत सौ. आरती कोडचवाडकर या मानाच्या पैठणीच्या मानकरी ठरल्या. तर सौ. हिना कांदळगावकर यांनी द्वितीय व सौ. सिद्धी करंगुटकर यांनी तृतीय क्रमांक मिळविला.

या स्पर्धेस महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तसेच यावेळी लहान मुलांसाठी आयोजित स्पर्धेत विघ्नेश भाटवडेकर विजेता ठरला. खेळ पैठणीचा स्पर्धेतील विजेत्या सौ. आरती कोडचवाडकर यांना पैठणी देऊन गौरविण्यात आले. तसेच दोन्ही विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेचे सूत्रसंचालन संजय शिंदे यांनी केले.

यावेळी युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर, बाळा मयेकर, राजन परुळेकर, आनंद वराडकर, कमलाकांत गवंडी, विलास परुळेकर, सचिन पाटकर, प्रसाद गवंडी, प्रशांत गवंडी, चित्रा हरमलकर, माजी नगरसेविका शर्वरी पाटकर, संध्या परुळेकर, सुषमा शिंदे, रोहित परुळेकर, आराध्या गवंडी, ऋतुजा परुळेकर, स्मिता पाटकर, स्वरा पाटकर, पूजा पराडकर, प्राची गवंडी, अनन्या वराडकर, वैशाली गवंडी, स्वाती परसनाईक, पुजा शिरगावकर, सुरज मंडलिक, गणेश धुरी, सिद्धी धुरी, निशय पालेकर आदी व इतर उपस्थित होते.

You cannot copy content of this page