मालवण दि प्रतिनिधी
शिवप्रभुची शिवलंका म्हणून ज्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो त्या मालवणच्या सागरातील किल्ले सिंधुदुर्गचा ३५७ वा वर्धापन दिन सोहळा सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती मालवणच्यावतीने उद्या गुरुवार दिनांक ६ एप्रिल २०२३ रोजी साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी सकाळी ८ वाजता मोरयाच्या धोंड्याचे पूजन, सकाळी १० वाजता श्री शिवराजेश्वर मंदिर येथे छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा, न्यू छत्रपती ब्रिगेड, कोल्हापूर यांची मर्दानी खेळांची सलामी, सकाळी ११ वाजता कवी भूषण यांचे शिवरायांवर आधारीत श्री. भूषण साटम हे काव्य सादर करणार आहेत
या कार्यक्रमास मालवण वासियांनी तसेच शिवप्रेमींनी उपस्थित रहावे असे आवाहन किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती, मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.
