कोळंब येथे उद्या नाटेकर आजी पुण्यतिथी उत्सव

⚡मालवण ता.०५-: कोळंब येथील प. पू. माताजी नाटेकर सेवामंडळ तर्फे प. पू. नाटेकर आजींचा २८ वा पुण्यतिथी उत्सव सोहळा दि. ६ एप्रिल रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळपासून दुग्धाभिषेक, लघुरुद्र, त्रिमूर्ती भक्ती सुगम संगीत, महाआरती, दुपारी १ वा. महाप्रसाद, त्यानंतर श्री स्वामी कृपा महिला वारकरी दिंडी, बुवा मंगेश नलावडे यांचे भजन (पखवाज- गौरव चव्हाण), सायंकाळी श्री नामदेव महाराज भक्त मंडळ यांचे वारकरी चक्री भजन, कलावती आई मंडळाचे भजन, भक्ती संगीत कार्यक्रम, रात्री संगीत भजन, कोळंब न्हीवे कांदळगाव येथील भजन मंडळींचे भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. सर्व भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन माताजी नाटेकर सेवा मंडळाचे अध्यक्ष भालचंद्र प्रभुगावकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page