तेरेखोल खाडीपात्रातील अवैध वाळू उपशावर महसुलची धाड

सात होड्या घेतल्या ताब्यात, एक जळाली

सावंतवाडी ता.०४-: आरोन्दा,तळवणे परिसरात तेरेखोल खाडीपत्रात होणाऱ्या अवैध वाळू उपसावर मंगळवारी पहाटे महसूल विभागाने अचानकपणे धाड टाकत मोठी कारवाई केली.कारवाई करत असताना एक होडी जाळून खाक केली,तर सात होड्या ताब्यात घेतल्या.


गेले कित्येक दिवस राजरोसपणे गोव्यातील वाळू माफिया महाराष्ट्र हद्दीलगत तेरेखोल खाडीपात्रात तळवणे व आरोन्दा किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करत असल्याच्या तक्रारी होत्या.या वाळू उपसा मुळे स्थानिक मच्छी व्यवसाय हा धोक्यात आला होता.तसेच किनाऱ्यालगतच्या कटड्याची धूप होत होती.यामुळे मंगळवारी महसूल विभागाकडून अचानकपणे पहाटेला धाड टाकत कारवाई केली.यात एक होडी जाळून खाक करत दोन परप्रांतीय मजूर व सात होड्या ताब्यात घेण्यात आल्या.या होड्यांच्या कारवाईबाबत जाबजबाब व पंचायादी करण्याचे काम पूर्ण करून सदरच्या होड्या मालकांच्या ताब्यात देण्यात आल्या.तसेच दगडकॉल येथील परप्रांतीयांसाठी बांधलेल्या झोपड्या ही महसूल विभाग कडून उध्वस्त करण्यात आल्या.कारवाई केलेल्या होड्यांवर महसूल विभागकडून दंडात्मक कारवाई करणार असून यापुढे जर अवैधपणे वाळू उपसा केल्यास यापेक्षा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार अरुण उंडे यांनी सांगितले.ही कारवाई सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.यावेळी
मंडल अधिकारी आंबोली जी आर गुरव,आजगांव मंडल अधिकारी विनायक कोदे,तलाठी खान ,तलाठी गोरे,तलाठी नागराज,तलाठी पाटोळे,तलाठी,तलाठी पास्ते,तलाठी गावडे,पोलीस उपनिरीक्षक यशवंते,पोलीस पी बी मुळे तलाठी कविटकर,तलाठी सोन्सुरकर,तलाठी संदीप मुळीक,पोलीस पाटील गंगाराम जाधव आदी उपस्थित होते.
फोटो ओळ — सावंतवाडी तहसीलदार उंडे यांनी कारवाई केलेल्या अनधिकृत वाळू उपसा करणाऱ्या होड्या.दुसऱ्या छायाचित्रात दगड खोल येथील कामगारांच्या उध्वस्त केलेल्या झोपड्या.
छाया – हेमंत मराठे

You cannot copy content of this page