बीडीएस परीक्षेत मदर तेरेसा स्कूलचे यश

⚡वेंगुर्ला ता.०४-: जानेवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बीडीएस परीक्षेत वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलचे ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. यात इयत्ता पहिलीतील दिया योगेश धुरी हिने सुवर्णपदक, सुजय प्रशांत परब याने रौप्य पदक तर इयत्ता नववीतील स्नेहा रंजन नार्वेकर हिने कांस्य पदक प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक फादर एन्थोनी डिसोजा, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page